तावरेवाडी येथील मंगाईदेवी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी तानाजी कागणकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2026

तावरेवाडी येथील मंगाईदेवी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी तानाजी कागणकर यांची निवड

तानाजी कागणकर

                                                              शिवाजी भरमु आवडण



चंदगड / प्रतिनिधी 

    तालुक्यात वारंवार चर्चेचा विषय असलेल्या आणि प्रचंड इर्षेने निवडणूक पार पडलेल्या तावरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री मंगाईदेवी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी तानाजी परशराम कागणकर तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी भरमु आवडण यांची निवड करण्यात आली.   

       

    चंदगड सहाय्य्क निबंधक प्रदीप मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित गोसावी व विजय तिप्पे  यांच्या उपस्थितीत हि निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी  सदस्य  सटूप्पा पाटील, वसंत कागणकर, विष्णु पाटील, जोतिबा कागणकर, भरत खणगुतकर, शिवाजी कुद्रेमानकर, लक्ष्मी हसबे, संगिता पाटील आदिसह भागोजी कागणकर, उमेश कागणकर, परशराम हसबे, सट्टूप्पा कागणकर, देवाप्पा कागणकर, शिवाजी कागणकर, म्हातारू कागणकर आदिसह सभासद उपस्थित होते. आभार सचिव सटूप्पा गावडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment