कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री, ता. चंदगड (नदी रोड) येथील रहिवासी जगदीश कृष्णराव पाटील वय ७१ वर्षे यांचे आज गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कालकुंद्री येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंदगड एसटी डेपो चे निवृत्त डेपो मॅनेजर हेमचंद्र तथा एच. के. पाटील यांचे ते बंधू तर सामाजिक कार्यकर्ते व कालकुंद्री गावचे माजी सरपंच हे एम. जे. पाटील यांचे चुलत बंधू होत.

No comments:
Post a Comment