चंदगड / सी एल वृतसेवा
भ्रष्ट राजकारण, साहुकारी, जमीनदारी किसान-मजदूर, रुढी-परंपरा, भ्रष्टाचार शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण, गरीबी अशा विभिन्न विषयांच जींवंत प्रतिबिंब प्रेमचंद यांच्या साहित्यातून उलगडते. असे प्रतिपादन हिंदी विभागप्रमुख व प्रमुख वक्ते डॉ संजय पाटील यांनी केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित लेखणीचे शिलेदार, थोर साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या १४६ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी स्टाफ सेक्रेटरी प्रा. व्हि. के. गावडे होते. त्यांनी प्रेमचंद यांच्या कार्य कर्तृत्वाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याचा अंगीकर करण्याचे आवाहन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की "प्रेमचंद हे एकोणीसाव्या शतकातील अग्रगण्य साहित्यिकांपैकी एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनाची अनेक रूपे त्यांच्या साहित्यातून उलघडतात. कौटुंबिक, पारिवारिक संघर्ष ते स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सक्रीय सहभाग, शेतकरी मजूर वर्गाची जान, सावकार, जमीनदार, राजकारण्यांकडून सामान्य माणसाची होणारी पिळवणूक, शोषण, जुन्या परंपरांचा पगडा, ब्राह्मणवाद, जातीव्यवस्था अशा विविध विषयांचा घोषवारा म्हणजे प्रेमचंद यांचे विविध अंगी साहित्य. गोदान, गबन, कर्मभूमी, रंगभूमी, कायाकल्प निर्मला, सेवासदन सारख्या कादंबऱ्या तसेच मानसरोवर कथासंग्रहामध्ये समाविष्ट सर्व कथामध्ये समाजाचे खरे प्रतिबिंब पहावयास मिळते. हिंदी साहित्यामध्ये उपन्यास सम्राट म्हणून ओळखले जाणारे प्रेमचंदांचे व्यक्तिमत्व आजच्या पिढीसमोर आदर्श ठरते. त्यांचे व्यक्तित्व व संपूर्ण साहित्य आजच्या पीढीसाठी अत्यंत प्रासंगीक व दिशादर्शक आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कथावाचन व स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी केले. यावेळी डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. बी. जी. गावडे, डॉ. एन. एस. मासाळ, डॉ पी एल भादवणकर, डॉ जी वाय कांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले तर आभार डॉ. एन. के. पाटील यांनी मानले.



No comments:
Post a Comment