अर्जुनवाडीचे माजी सरपंच शिवाजी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2026

अर्जुनवाडीचे माजी सरपंच शिवाजी पाटील यांचे निधन

 

शिवाजी पाटील

नेसरी / सी एल वृत्तसेवा

    अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) गावचे माजी सरपंच शिवाजी गोविंद पाटील यांचे निधन गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी झाले. त्यांच्या निधनाने अर्जुनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

शिवाजी पाटील यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने गावाने एक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, मोठी बहीण, लहान भाऊ तसेच पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment