चंदगडची कन्या निहारिका भारत गावडे ला जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक, किक बोर्ड १२.५ मीटर प्रकारात यश - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2026

चंदगडची कन्या निहारिका भारत गावडे ला जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक, किक बोर्ड १२.५ मीटर प्रकारात यश

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       जलतरण क्रीडा प्रकारातील चंदगड तालुक्यातील उगवता तारा भगतसिंग भारत गावडे (आसगाव, ता. चंदगड) याच्या पाठोपाठ त्याची बालवाडीत शिकणारी छोटी बहीण निहारिका भारत गावडे हिने भाग घेतलेल्या पहिल्याच जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत जलतरण कलेतील चुणूक दाखवली. 

      निहारिका हिने नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत हे उल्लेखनीय प्राप्त केले. या स्पर्धेचे आयोजन स्विमिंग क्लब बेळगाव यांच्यावतीने जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज के एल ई च्या स्विमिंग पूल वर पार पडल्या. निहारिका हिने किक बोर्ड १२.५ मीटर स्पर्धेत हे सुवर्णपदक जिंकले. ती मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे बालवाडीत शिकत असून स्विमर्स क्लब, बेळगाव येथे नियमित पोहण्याचा सराव करते. तिला अजिंक्य मेंडके, अतुल, आकाश, राजेश, संजू आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     जलतरण क्रीडा प्रकारातील उगवते तारे भगतसिंग व निहारिका हे बहिण भाऊ आपल्या शाळेसह चंदगड तालुक्याचे नाव उज्वल करताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment