
चंदगड : नायब तहसीलदर प्रकाश जोशिलकर यांना निवेदन देताना श्रीकांत कांबळे, चंद्रकांत काळे, अनिल पुजारी, अमोल वाघवेकर, प्रल्हाद कांबळे आदी.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मळवीवाडी (ता. चंदगड) येथील सरकारी जमीन विक्री प्रकरण हे सीबीआयकडे वर्ग करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी, यासाठी भारतीय दलित महासंघातर्फे सोमवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी चंदगड येथे निदर्शने केली.
नायब तहसीलदार प्रकाश जोशीलकर यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मळवीवाडी येथील सरकारी जमीन विक्री प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाई होणे आवश्यक आहे. याप्रकरणी एक साखळी कार्यरत आहे. ही साखळी उध्वस्त करून कडक कारवाई करा. अशी मागणी करण्यात आली.
यावेळी दलित भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत कांबळे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पुजारी व अमोल वाघवेकर, चंदगड तालुकाप्रमुख प्रल्हाद कांबळे, उपाध्यक्ष मनोज कांबळे, सचिव सुभाष कांबळे, बाबू विंझणेकर, संतोष कांबळे, राकेश कांबळे, प्रकाश कांबळे, अरुण कांबळे, परशराम कांबळे, सुभाष कांबळे, मनोज कांबळे, अनंत कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment