कालकुंद्री येथील श्रीमती महानंदा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2026

कालकुंद्री येथील श्रीमती महानंदा पाटील यांचे निधन

 

श्रीमती महानंदा शामराव पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    सुभाष गल्ली, कालकुंद्री (ता चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती महानंदा शामराव पाटील वय वर्षे ७३ यांचे अल्पशा आजाराने आज दि ०६/ १०/२०२६ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन चिरंजीव, दोन कन्या, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी कालकुंद्री स्मशानभूमी येथे करण्यात आला.

   महानंदा पाटील या कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील भावेश्वरी हायस्कूलचे आध्यापक विश्वास शामराव पाटील यांच्या मातोश्री तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, चंदगड तालुका सरपंच संघटनेचे संस्थापक व माजी अध्यक्ष एम.जे. पाटील यांच्या भावजय होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि. ७ रोजी होणार आहे. 

No comments:

Post a Comment