चंदगडला स्थानिक आघाड्यांना संमिश्र यश - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2018

चंदगडला स्थानिक आघाड्यांना संमिश्र यश


         चंदगड तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणुक लागली होती. त्यापैकी उत्साळी गामपंचायत बिनविरोध झाली तर नगरपंचायतीच्या मुद्यावर चंदगड ग्रामस्थांनी निवडणुकीवर चौथ्यादा बहिष्कार घातला. उर्वरीत मजरे कार्वे, मजरे कार्वे, आमरोळी-पोरेवाडी, गणुचीवाडी, पारगड-मिरवेल-नामखोल या पाच ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये स्थानिक दैवतांच्या आघाड्यांना संमिश्र यश मिळाले.
        ग्रामपंचायतीचा निकाल एकण्यासाठी कार्यकर्ते सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच तहसिल कार्यालयाच्या जुन्या इमारतीबाहेर गटागटाने थांबून होते. सकाळी अकरा वाजता पहिल्यांदा गुणचीवाडी ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर करण्यात आला. एकेका प्रभागाचा निकाल हाती आल्यानंतर जिंकलो रे....... अरे आवाज कोणाचा अशा घोषणा देत कार्यकर्ते गेटबाहेर येत होते. मतदानाप्रमाणेच निकालावेळीही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दुपारी साडेबारा शेवटी कार्वे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. गुलालात न्हाऊन निघालेले कार्यकर्ते गटागटाने मोबाईलमध्ये फोटो काढून घेत होते. निकालानंतर अनेक गावात फटाकडे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा - ग्रामपंचायत निवडणुक निकालनंतरचा जल्लोष      
    सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले उमेदवार निकाल पुढीलप्रमाणे.........
       मजरे कार्वे येथील ग्रामपंचायतीमध्ये हनुमान विकास आघाडी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन ग्रामविकास आघाडी होती. यामध्ये सत्ताधारी ग्रामविकास आघाडीने वर्चस्व राखले. यामध्ये सरपंच म्हणून शिवाजी जोतिबा तुपारे हे निवडून आले आहेत. यामध्ये दिलीप नागोजी परीट, प्रियांका जयवंत हारकारे, निवृत्ती गुंडोपंत हारकारे, स्मीता बाबाजी बेनके, पांडुरंग कृष्णा बेनके, अंजली अर्जुन सुतार, बेबाताई अशोक बोकडे या निवडून आल्या आहेत.
      मौजे कार्वे येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री विठ्ठल रखुमाई ग्रामविकास आघाडी विरोधात श्री देव कल्मेश्वर ग्रामविकास आघाडीमध्ये लढत झाली. यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार जोतिबा वैजु आपके निवडून आले. तर सदस्य म्हणून मंगल जानबा पाटील, विद्या परशराम मांडेकर, राजेंद्र ओमाना पाटील, अशोक नागोजी कांबळे, नंदाताई शिवाजी चाळुचे, सुनिता मारुती ओऊळकर, रमेश संभाजी नाईक, नामदेव पाटील, अर्चना प्रकाश पाटील हे निवडून आले आहेत.
       आमरोळी-पोरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सुवर्णा महादेव पाटील या 39 मतांनी विजयी झाल्या. सरस्वती भरमू पाटील, संजय यशवंत सुतार, संगीता तुकाराम नाईक, रेश्मा दौलत मंडलिक, बाबाजी संतोबा धरमले, निर्मला नामदेव मेंगाणे या निवडून आल्या आहेत. तर महादेव दत्तु कांबळे, संदिप राजाराम पाटील, सोनल सुभाष गुरव हे बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी आमरोळी-पोरेवाडी ग्रामदैवतेच्या लक्ष्मी देवीची यात्रा असल्याने ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्यात आली होती. श्री भावेश्वरी ग्रामविकास आघाडी विरोधात स्थानिक आघाडीमध्ये निवडणुक लागली होती. श्री भावेश्वरी ग्रामविकास पॅनेलचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
      गणुचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये आठ जागामध्ये दोन जागांसाठी निवडणुक लागली  होती. यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार शोभा भादणवकर, सदस्य तुळशीराम नाईक, सविता भादवणकर, सरीता नाईक, मारुती ढोकरे, सागर आर्दाळकर हे बिनिविरोध निवडून आले होते. दोन जागासाठी निवडणुक लागली होती. यामध्ये कमल आप्पा देसाई व नंदा मारुती वाईंगडे या निवडून आल्या आहेत.
        पारगड-मिरवेल व नामखोल ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आठ जागांसाठी निवडणुक लागली होती. यामध्ये ना. मा. प्रवर्ग व अनु. जातीसाठीच्या तीन जागांसाठी अर्ज दाखल झाले नाहीत. सर्वसाधारणसाठी दाखल केलेला अर्ज अपात्र ठरल्याने तीही जागा रिक्त राहिली. यामध्ये केवळ सरपंच पदासाठी निवडणुक लागली होती. यामध्ये सरपंचपदी सरपंचपदी संतोष बाबाजी पवार हे निवडून आले. पार्वती धोंडू शिंदे, सावित्री सखाराम पवार व अर्जून धोंडू तांबे हे सदस्यपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
       उत्साळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी संतोष सावंत-भोसले तर सदस्यपदासाठी खंडेराव राजाराम देसाई, रुक्माणा नारायण मटकर, वसंत अर्जुन सुतार, सुनिता गुरुनाथ मोरे, अनिता विठोबा मटकर, रेखा पुंडलिक दळवी, आनंदी यादव हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.