साईबाबांच्या शताब्दी वर्षानिमित्त पायी पालखी दिंडीचे चंदगड आगमन - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2018

साईबाबांच्या शताब्दी वर्षानिमित्त पायी पालखी दिंडीचे चंदगड आगमन

शिर्डी साईबाबा यांच्या शताब्दी वर्षानिमित्त साई भक्तांच्या वतीने शांततेचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी कुडाळ ते बेळगाव पायी पालखी दिंडीचे आयोजन केले आहे. या अंतर्गत सोमवारी या दिंडीचे चंदगड येथे आगमन झाले. या वेळी साईबाबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या पायी दिंडी सोहळ्याची समाप्ती बेळगाव येथे होणार असल्याची माहीती दिंडीचे प्रमुख मोहन चिगरे यांनी सांगितले.

साई बाबांच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले साईभक्त.
       श्रध्दा सबुरी, सबका मालिक एक असे साईबाबांचे संदेश समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पायी दिंडी सोहळ्याची सुरवात कुडाळ येथून 29 सप्टेंबर 2018 रोजी झाली आहे. कुडाळहून माणगाववाडी ते चंदगड येथे मुक्कामी होती. मंगळवारी सकाळी दाटे येथे त्यानंतर कार्वे येथे मुक्कामी जाणार आहे. तेथून बेळगाव येथे 4 ऑक्टोबर 2018 ला या पालखी सोहळ्याची समाप्ती होणार आहे. या समाप्ती कार्यक्रमाला बेळगाव, निपाणी व चंदगड परिसरातील भक्त सहभागी होणार आहेत. या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये 90 हुन अधिक भक्त सहभागी झाले आहेत. कुडाळ ते बेळगाव हा 130 किलोमीटरचा प्रवास असून साईभक्त रोज 30 ते 35 किलोमीटरचा रोज प्रवास करत आहेत. यामध्ये 30 हुन अधिक महिला भक्त सामील आहेत. याचबरोबर दर शनिवारी एका मंदिराला जाऊन आरती करुन शताब्दी वर्षाची जनजागृती केली जाते.