मराठा बांधवांशी विचार विनिमय करुन स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा निर्णय -अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2018

मराठा बांधवांशी विचार विनिमय करुन स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा निर्णय -अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर

मराठा समाजाचा सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी वापर केला आहे. या समाजाला कायम स्वरुपी गृहीत धरुन समाजाला वापरण्याचा कट उधळून लावण्याकरीता आज मराठा समाज्याचा स्वतंत्र पक्ष स्थापन करुण्याचा निर्णय झाला आहे. तमाम मराठा समाजाशी विचार विनिमय करुन दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करुन शपथविधी घेण्यात जाणार असल्याची माहीती मराठा क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर यांनी दिली. चंदगड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहीती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना मराठा क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर
       मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे काढले. तरीही अद्यापही त्यांच्या हातात काहीही पडले आहे. केवळ संघर्ष करणे हे त्यांच्या नशिबी आले आहे. मराठा समाज संघटित नसल्यामुळे याच सर्वच घटक फायदा घेत आहेत. त्यांना संघटित करुन लढा उभारण्याचा आमचा मनोदय आहे. यातून आज मराठा समाजासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची गरज आहे. स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी आपली हजेरी प्रार्थनीय आहे. आपल्या पक्षाचा मुख्य उद्देश प्रस्तापित राजकीय पक्ष व नेत्यांना आपले अस्तित्व दाखवने, मराठा समाजाला आरक्षणसंरक्षणशिक्षण शेती उद्योग-धंदेरोजगार निर्मिती व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करने. या धर्तीवर तमाम मराठा बांधवांशी चर्चा करण्यासाठी येत्या 8 ऑक्टोबर 2018 रोजी हलकर्णी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाच्या मैदानावर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेला तानाजी शिंदेअवधुत गुरवगोविंद सुतार आदी उपस्थित होते.