सर्वांनी सहकार्य केल्यास दौलत चालविण्याची तयारी - राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2018

सर्वांनी सहकार्य केल्यास दौलत चालविण्याची तयारी - राजेश पाटील


शिनोळी (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका संघाच्या सभेत बोलताना संघाचे अध्यक्ष राजेश पाटील व इतर.












दौलत कारखाना तालुक्याची अस्मिता आहे. दौलत सुरु होणे हि तालुक्याच्या दृष्टीने 
महत्वाची बाब आहे. दौलत सुरु होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत. तालुक्याच्या 
विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून पाठींबा दिल्यास आम्ही दौलत चालविण्याची आमची 
तयारी आहे. जिल्हा बँकेने आम्हाला कारखाना चालवायला दिल्यास बँकेला अडचणीतून 
बाहेर काढु असे प्रतिपादन तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील यांनी व्यक्त केले. 
शिनोळी (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका संघाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
     व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी विषयपत्रिका वाचनात संस्थेच्या प्रगतीचा 
आढावा घेतला. संघाचे अध्यक्ष श्री. पाटील पुढे म्हणाले, ``चंदगडचा शेतकऱ्यांनी जिल्हा 
बँकेच्या कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. बँकेने आमच्यावर विश्वास टाकल्यास सर्वांना
विश्वासात घेऊन तोडगा करण्याची माझी तयारी आहे. ज्या प्रमाणे न्युट्रीयन्सला 
कारखाना चालवायला दिला त्याच निकषावर जिल्हा बँकेने आम्हाला कारखाना द्यावा.
`` संघाच्या प्रगतीबाबत बोलताना ते म्हणाले ``तुलशी बाजारच्या माध्यमातून सभासदांच्या
 अपेक्षेप्रमाणे संघाची दमदार वाटचाल सुरु आहे. यावर्षी संघाला 25 लाखांचा नफा झाला 
असून संचालक मंडळाने सभासदांना दोन लिटर तिळेल लाभांश स्वरूपात देण्याचा निर्णय 
घेतला आहे. ``
भाजप कार्यकारीणी सदस्य गोपाळ पाटील म्हणाले, ``राजेश पाटील यांनी पाच लाख 
नफ्याचा संघ 25 लाखांपर्यंत नेला आहे. चांगल्या कामात आम्ही सतत राजेश पाटील 
यांच्यासोबत राहु. झालेले सर्व विसरुन पुन्हा नव्याने कामाला लागून सर्वांच्या सहकार्याने 
दौलत सुरू करू करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.`` यावेळी बेळगावचे आमदार 
अनिल बेनके, भाजपा कार्यकारिणी सदस्य गोपाळ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे 
चेअरमन गोविंद सावंत, अल्लीसो मुल्ला, दिग्वीजय देसाई, पांडुरंग बेनके, देसाई यांचा 
शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तानाजी पाटील, विष्णू पाटील
विष्णू देसाई, अमृत पाटील, अर्जुन चौगुले, सुनिल पवार, महादेव कांबळे, ज्योतिबा आपके 
आदींचा चर्चेत सहभाग घेतला. व्यासपीठावर परशराम पाटील, गोपाळ गावडे, विठोबा 
गावडे, पुंडलिक पाटील, बाळासो घोडके, तानाजी गडकरी, अभय देसाई, राजीव जाधव 
यांच्यासह संचालक उपस्थित होते. आभार पोमाण्णा पाटील यांनी मानले.
  आमदार झाल्याशिवाय विकास होणार नाही............बेनके
        बेळगावचे आमदार अनिल बेनके यांनी चंदगड तालुक्याच्या आमदार झाल्याशिवाय 
तालुक्याचा विकास होणार नसल्याचे सांगून कै. नरसिंगराव पाटील यांच्या घरातला 
आमदार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी कै. नरसिंगराव पाटील यांच्या
यांच्या आठवणींना उजाळा दिला.