`स्वराज्याचा बळीराजा` या लघुपटातून शेतकऱ्यांचे दुःख समाजासमोर - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2018

`स्वराज्याचा बळीराजा` या लघुपटातून शेतकऱ्यांचे दुःख समाजासमोरनिसर्गाचा लहरीपणा व माणसाच्या चुका. यामुळे शेतकऱ्यांवर अनेक संकटे कोसळत आहेत. कर्जबाजारीपणा व खासगी सावकारीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करावे या दृष्टिकोनातून नवोदित कलाकारांना एकत्र येऊन स्वराज्याचा बळीराजा या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटाचे प्रदर्शन कागणी (ता. चंदगड) येथे  मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया कांबळे होत्या.
कागणी तालुका चंदगड येथे एमएमएस चित्रपटाचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद सदस्य कांनाप्पा मोहन जेके पाटील सरपंच सुप्रिया कांबळे श्रीकांत पाटील उपसरपंच बाळासाहेब देसाई आदी.
     मारुती बाचुळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते एम. एम. एस. या चित्रपट शुटिंगचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लेखक अक्षय बेळगावकर, दिग्दर्शक रवींद्र यळवटकर, गीतकार प्राध्यापक आशोक अलगुंडी संतोष कांबळे सागर गुंजीकर गोरुसिध्द हिरेमाठ, शिवाजी कोकितकर रुपा हिरेमठ नागराज पाटील ना बामणे गुंजीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेके पाटील उपसरपंच बाळासाहेब देसाई शांत पाटील माजी सरपंच जनार्दन देसाई उपस्थित होते खंडोबा देसाई यांनी आभार मानले.