![]() |
खासदार छत्रपती
संभाजीराजे भोसले
|
चंदगड
तालुक्यात शुक्रवारी (ता. 5) खासदार छत्रपती
संभाजी राजे भोसले(कोल्हापुर)
यांच्या हस्ते विविध विकास कामांचा
शुभारंभ होणार आहे. सायंकाळी चार वाजता कालकुंद्री येथील रस्ता डांबरीकरण उद्घाटन, साडेचार वाजता किणी येथील सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन,पाच वाजता पाच वाजता डुक्करवाडी येथील रस्ता डांबरीकरण
उद्घाटन, सहा वाजता मौजे कलीवडे येथील शाळा कपांऊंड व सांस्कृतीक
सभागृहाचे उद्घाटन त्यानंतर ऐतिहासीक गधंर्वगड येथे सांयकाळी सात वाजता रस्ता
डांबरीकरण उद्घाटन खास. सभांजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत
चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यानी
उपस्थित राहावे असे आवाहन नदंकुमार ढेरे यांनी केले आहे.