![]() |
राजगोळी खुर्द (ता.
चंदगड) येथील ऒलम (हेमरस) साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमावेळी कारखान्याचे को-जन हेड बी. आर. योगेशा व इतर मान्यवर.
राजगोळी खुर्द (हेमरस) (ता.
चंदगड) ओलम ॲग्रो इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ च्या ८ व्या
गाळप हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन व पुजा समारंभ बुधवार (ता. 10) रोजी कारखान्याचे को-जन
हेड बी. आर. योगेशा व सौ. बी. आर. रश्मी यांच्या हस्ते पार पाडला. कारखाना गळीत हंगाम
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात भरत कूडंल (बिजनेस हेड शुगर इंडिया), पी. देवराजलु (हेड टेक्नीकल), सुधीर पाटील (केन
हेड), सतीश भोसले (एच. आर. मॅनेजर) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या
कार्यक्रमाला कारखान्याचे प्रमुख भरतकुडंल, कारखान्यातील विभागप्रमुख सर्व कामगार,
शेती विभागातील शेती अधिकारी सुधिर पाटील व कर्मचारी, हेमरस युनियनचे पदाधिकारी, शेतकरी,
वाहतुकदार, कारखान्याचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.