मराठा समाजाच्या हितासाठी संघटीत व्हा – जिल्हाध्यक्ष भोसले - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2018

मराठा समाजाच्या हितासाठी संघटीत व्हा – जिल्हाध्यक्ष भोसले


हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना साईटवर मराठा समाजाच्या मेळाव्यात बोलताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल  पेणडेकर
मराठा समाजाला राजकारण्यांनी आजपर्यंत गृहीत धरले आहे. त्यामुळे त्यांचा विकास खुंटला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक मोर्चे काढूनही सरकार अजूनही त्यावर विचार करते. एवढे धैर्य व संयम दाखवूनही पदरी अद्यापही केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाजाने गट-तट विचारात न घेता एकत्र यावे. कारण आपल्या सर्वांचे ध्येय एक असून त्यासाठी संघटीत व्हा असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष परेश भोसले यांनी मत व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना साईटवर मराठा समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मराठ्यांच्यासाठी वेगळा पक्ष स्थापन करण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. 
जिल्हाध्यक्ष परेश भोसले पुढे म्हणाले, ``मराठा समाज अनेक वर्षे विविध प्रकारच्या सवलती पासुन वंचित आहे. सकल मराठा जागृत होवून मराठ्यांच्यासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करत आहे. हे पाहून सरकार धास्तावले आहे. मराठ्यांच्या एका शब्दामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येणे शक्य झाले नाही. यावरुन मराठ्यांच्या एकजुटीची ताकद येते. मराठा एकटा नाही. एक मराठा, लाख मराठा ही ताकत एका शब्दांतुन दिसली आहे. सरकारने आकस बुद्धीने अनेकांना तुरंगात टाकले. पण आत टाकलेल्यांना ऊलट धैर्य वाढले असल्याचे सांगितले.``
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर यांनी आपल्या मनोगतात सरकारने ढोंग करु नये. येत्या नोव्हेंबर पुर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा ऐन दिवाळीच्या काळात शिमग्याची परिस्थिती होईल असे सांगितले.`` आशाताई देवर्डै यांनी मराठा समाज राजकीय दलदलीतुन बाहेर पडला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, युवा जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकरयुवा जिल्हा कार्यअध्यक्ष संतोष कांदेकर, भरत तोडकर, लता पालकर, बाळु नार्वेकर, नामदेव पाटील, परशुराम सुतार, एन. के. पाटील, राजु हसबे, भरत तोडकर यांच्यासह मराठी बांधव उपस्थित होते.