गदिमा म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर सोनेरी स्वप्न - श्री. शिवणगेकर - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2018

गदिमा म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर सोनेरी स्वप्न - श्री. शिवणगेकर


ग. दि. माडगुळकरांनी गीतरामायण लिहून ते महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचवले. त्यांच्या काव्य, गीताने मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस आणले. त्यांचे साहित्य प्रत्येक वाचकापर्यंत पोचवणे हेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर यांनी केले.  तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयात कवीश्रेष्ठ ग. दी. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी निमीत्त `मराठी अध्यापक संघ व साहीत्यरत्न` चंदगड यांच्या संयुक्त विदयमाने `काव्य संमेलन` संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जी. एन. पाटील होते. 
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयात  काव्य संमेलनात बोलताना एम. एन. शिवनगेकर व इतर शिक्षकवृंद
पर्यवेक्षक एस. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. काव्य संमेलनात विविध विषयांवरच्या सुरेल, रंजक व विनोदी बाल कवीता सादर करण्यात आल्या. कवींच्या बहारदार कवीतांचा विद्यार्थ्यांना पुरेपूर आस्वाद घेता आला. या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थीही भारावून गेले. विविध विषयावरच्या कवितांनी कार्यक्रमाला रंगत आली. काव्य संमेलनात एच. के पाऊसकर, गोपाळ कांबळे, संजय साबळे, भरत गावडे, विश्वनाथ मुरकुंडी, बी. एन. पाटील, एम.के पाटील, हनमंत पाटील, जयवंत जाधव या कवी बरोबरच जनता विद्यालयाच्या वैष्णवी कांबळे, सानिका भडाचे, तबसुम शेख, ॠतुराज पाटील, निकीता खोत आदी बालकवींनी आपल्या स्वरचीत कवीता सादर केल्या. सुत्रसंचालन प्रमोद चांदेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता विद्यालयाच्या  अध्यापक वर्ग व शिक्षककेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार ए. एस. पाटील यांनी मानले.