राज्य पाठ्यपुस्तक मंडळ सदस्यपदी प्रा. प्रकाश बोकडे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2018

राज्य पाठ्यपुस्तक मंडळ सदस्यपदी प्रा. प्रकाश बोकडे यांची निवडप्रा. प्रकाश बोकडे


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) पुणे यांच्या वतीने पाठ्यपुस्तक मंडळाच्या सहकार विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी चंदगड तालुक्यातील बागिलगे-डुक्करवाडी (रामपुर) येथील प्रा. प्रकाश जोतिबा बोकडे यांची सदस्यपदी  निवड झाली. इयता अकरावी व बारावीच्या (उच्च माध्यमिक स्तर) नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य निर्मितीचा कार्यक्रम आखणे, लक्षावधी मुलांना निर्दोष व दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार करणेकामी हि निवड करण्यात येत असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिले आहे. प्रा. बोकडे यांनी सहकार विषयात सतत विभागीय बोर्डात आपले विद्यार्थी बोर्डाच्या यादीत चमकवले आहेत. शैक्षणिक सादर केलेले शोध निबंध या कार्याची दखल घेऊन हि निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

    Samsung Galaxy J8 (Black, 4GB RAM, 64GB Storage) with Offers