गंधर्वगडाला देशाच्या नकाशावर आणणार - खासदार संभाजीराजे - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2018

गंधर्वगडाला देशाच्या नकाशावर आणणार - खासदार संभाजीराजेस्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ल्यांच्या यादीत चंदगड तालुक्यातील गंधर्वगडाचा गावांचा समावेश आहे. 1844 साली झालेल्या पहिल्या स्वातंत्र लढ्यात या गडावरील गडकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे या गडाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विकासनिधी देवून गंधर्वगडाला देशाच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. ते गंधर्वगड (ता. चंदगड) येथे गडाची पाहणी व विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच अजित पाटील होते.

गंधर्वगड (ता. चंदगड) येथे गडाची पाहणी व विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमात विकासकामांचा शुभारंभ करताना खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, पै. विष्णू जोशिलकर, नंदकुमार ढेरे, अजित पाटील व इतर.
प्रास्ताविक तानाजी चांदेकर यांनी करून शिवरायांच्या गडकोट किल्यांच्या यादीत 111 व्या क्रमांकावर असलेल्या गंधर्वगडाची दुरावस्था झाली असून बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वारासह गडाचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. खासदार संभाजीराजे पुढे म्हणाले``गंधर्वगडाचा पर्यटनवाढीसाठी विकास करणे शक्य आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्यास युवकांच्या हाताला काम मिळेल. गंधर्वगडचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. गावचा विकास साधताना राजकारण बाजूला ठेवा असेही आवाहन त्यांनी केले.``


अनिल होडगे यांनी राजकीय लोकांच्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत विकासापासून वंचित असलेल्या गडाचा विकास करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी गंधर्वगड दत्तक घ्यावा असे आवाहन केले. प्रा. डॉ. नंदकुमार गावडे यांनी चंदगड तालुक्यातील सर्व गडांचा समावेश पर्यटन यादीत करावा अशी मागणी केली. यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर खासदार संभाजीराजे यांचे स्वागत झाले. वारकरी मंडळींनी दिंडीच्या निनादात त्याची गावामध्ये मिरवणुक काढली. यावेळी रस्त्याचा डांबरीकरणाचा शुभारंभ खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर, डॉ. हरीश पाटील, उपसरपंच संजना अमृतकर, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत, विश्वास निंबाळकर, अमर पाटील, मारुती साळुंखे, सरपंच अंकिता आदकारी, सुरेश कडलगेकर, विलास होडगे, पुंडिलक धुळप, चंद्रशेखर गावडे, भरमु यादव, नामदेव सरनोबत, अशोक कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. एस. व्ही. सुतार यांनी सूत्रसंचालन केले. बापू शिरगावकर यांनी आभार मानले.

स्वातंत्र्यानंतर रायगडावर फक्त 1 कोटी 21 लाख खर्च
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्याच्या दुरुस्तीसाठी स्वातंत्र्यप्राप्ती ते आजपर्यंत फक्त एक कोटी 21 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. पण आपण स्वतः रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या विकासासाठी 600  कोटी रुपये निधी आल्याचे सांगून या निधीच्या माध्यमातून रायगडासह परिसरातील गावांचा विकास साधणार असल्याचे यावेळी खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.