कविता जगण्याची नवी उमेद देते - प्रा. मगदुम - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2018

कविता जगण्याची नवी उमेद देते - प्रा. मगदुमकविता हे आत्मविष्काराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवन संघर्षात कविताच सातत्याने जगण्याची उमेद देत असते. व्यापक जीवनानुभव कतिवतेतून व्यक्त होत असतो. निसर्ग, प्रेम, जीवन, तारुण्य, देशभक्ती, मैत्री, स्त्री भृणहत्या, विषमता या सर्वच विषयावरील कविता अंतर्मुख करतात. सुप्तगुणांचा विकास करणे, अभिव्यक्ती करणे हे आजवर कवितेने जोपासलेले व वृध्दिंगत केलेले बीज आहे असे प्रतिपादन प्रा. बी. बी. मगदुम यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी, हिंदी, मराठी भाषा विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या काव्यानंदकार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.

चंदगड : माडखोलकर महाविद्यालयात `काव्यानंद`कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डाॅ. पाटील व इतर.
प्रास्तविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सरोजिनी दिवेकर यांनी केले. प्राचार्य श्री. पाटील यांनी ``विद्यार्थ्यांनी स्वतंत्र काव्यलेखन करुन स्वतःची संवेदनशीलता जपणे व भोवतालच्या जगाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे असे सांगितले.`` यावेळी इंग्लिश लिटरशी असोसिएशनच्या वतीने भित्तीपत्रकांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. एल. एन. गायकवाड, ज्योती मटकर, मनस्विनी देवगिरी, अनिल चौगुले, अमोल गावडे, शंकर कांबळे, अजय हंबेरकर, रुपाली गुरव, सुखराणी पाटील आदी विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. यावेळी प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. पी. एल. भादवणकर, प्रा. आर. के. तेलगोटे, प्रा. एस. डी. गावडे, प्रा. टी. एम. पाटील, डॉ. एन. के. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. ए. पी. पाटील, डॉ. आर. कमलाकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी उपस्थित होती. सूत्रसंचालन स्वप्नाली पाटील यांनी केले. आभार प्रा. एस. एन. पाटील यांनी मानले.