चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी दुर्गादेवीची शांततेत प्रतिष्ठापना - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2018

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी दुर्गादेवीची शांततेत प्रतिष्ठापना


शहरासह चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी आज दुर्गादेवीचे आज आगमन झाले. तालुक्यातील 46 मंडळांनी सायंकाळी दुर्गादेवी मुर्तीची प्रतिष्ठापना केली. गावातील कुंभारवाड्यासह मुर्ती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी गावातून मिरवणुकीने मंडपात आणण्यात आली. यावेळी बेंजो व ढोल या पारंपारिक वाद्यांच्या गजरात हि मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये अबालवृध्दासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दुर्गामाता की जय, अंबे माता की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी वातावरणात परिसर दुमदूमून गेला होता.

चंदगड येथील दुर्गा मंडळाने काढलेली दुर्गामातेची मिरवणुक.

चंदगड येथे शिवाजी गल्लीमध्ये दरवर्षी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाते. आज सकाळी चंदगड शहरातील विनायक नगर व गरीबी हटाव परिसरात दुर्गा दौंडचे आयोजन केले होते. भल्या पहाटे तरुण घोषणा देत दुर्गा दौडमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान कोवाड (ता. चंदगड) येथेही घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षा प्रमाणे याही दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. प्रारंभी शिवरायांच्या आश्वारूढ पूतळ्या चे पूजन करण्यात आले. दौडच्या पहिल्या दिवशी भगवा ध्वजाचा मान सरपंच सौ. अनीता भोगण यांना देण्यात आला होता. पहाटे पाच वाजता दौडला सुरवात झाली. सकाळच्या पांढरं शुभ्र धुक्यामध्ये, डोकीवर पांढरी टोपी, पांढरा शुभ्र पेहराव, अनवाणी पायांनी दौड पळत बाल चमू पासून वृध्दा पर्यंत दौड चे कार्यकर्ते या दुर्गामाता दौडी मध्ये सामील झाले होते. गलोगल्लीत दौडच्या स्वागतासाठी रंगी-बेरंगी रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. भगव्या ध्वजाचे सुहासिनी महिलांनी घरोघरी औक्षण केले.