चंदगड येथे स्वाईन फ्लू व डेंग्युबाबत शुक्रवारी कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2018

चंदगड येथे स्वाईन फ्लू व डेंग्युबाबत शुक्रवारी कार्यशाळा


स्वाईन फ्लू व डेंग्यु या आजाराबाबत चंदगड पंचायत समिती सभागृहात शुक्रवार (ता. 12) दुपारी तीन ते पाच या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय कुमार गवळी यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू व डेंग्यु सदृश्य परिस्थिती निर्माण झालेले आहे. त्यामुळे  मृत्यूही होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे 6 ऑक्टोबर 2018 रोजी राज्याचे आरोग्य मंत्री यांनी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी स्वाईन फ्लू व डेंग्यु सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला. चंदगड पंचायत समितीमध्ये होणाऱ्या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुका पातळीवरील पदाधिकारी, अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, चंदगड तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे.