उत्साळी ग्रामपंचायतीच्या वतीने बसच्या मागणीसाठी आगारप्रमुखांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2018

उत्साळी ग्रामपंचायतीच्या वतीने बसच्या मागणीसाठी आगारप्रमुखांना निवेदन



उत्साळी (ता. चंदगड) गावासाठी बससेवा सुरु करावी. या मागणीचे निवेदन आगाराला देताना सरपंच माधुरी सावंत-भोसले
चंदगड आगाराने उत्साळी या गावासाठी बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय दूर करावे अशी मागणी ग्रामपंचायतीमार्फत सरपंच माधुरी सावंत-भोसले यांनी आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर आजअखेर या गावांमध्ये अद्यापही बससेवा सुरू झाली नाही. सुरू झाली ती कानूर-अडकूर मार्गे कोल्हापूर, पुणे, मुंबई अशी बससेवा सुरू आहे. येथील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी चंदगड, नागनवाडी आदी ठिकाणी जावे लागते. येथील विद्यार्थ्यांना भल्या पहाटेपासून उत्साही ते अडकूर अशी पाच किमीची पायपीट करावी लागते. बस सेवा नसल्याने येथील आजारी रुग्ण व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. चंदगड आगाराची नेसरी येथे बेळगावला जाणारी बस मुक्कामी असते. तीच बस उत्साळी येथे मुक्कामाला ठेवून नेसरी मार्गे बेळगाव बस सुरु करावी. तसेच चंदगड, इनाम सावर्डे, पोवाचीवाडी, सत्तेवाडीमार्गे गडहिंग्लज जाणारी बस उत्साळी मार्गे सुरु करावी अशी मागणी उत्साळी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनातून केली आहे.