बेरड रामोशी समाजाचे विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2018

बेरड रामोशी समाजाचे विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांना निवेदन

बेरड रामोशी समाज व जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन खासदार संभाजीराजे यांना दिले.
चंदगड तालुक्यातील बेरड रामोशी समाज व जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना देण्यात आले. रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी कालकुंद्री येथे ते आले असताना त्यांना निवेदन देण्यात आले. सरकारने अनेकवेळा आश्‍वासन मिळूनही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीसह भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पराक्रम गाजवलेल्या बेरड रामोशी समाज सुविधांपासून वंचित आहे. त्यांना आरक्षणासह भारतीय सैन्यात नाईक बलालियन सुरु करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल नाईक, तालुका संपर्क प्रमुख मोहन नाईक, बाबू पिटूक, गजानन पिटूक, वसंत नाईक, नारायण नाईक, लक्ष्मण नाईक, भरमू नाईक, भैरु नाईक, परसू नाईक, विठ्ठल नाईक, दीपक नाईक, कल्लापा नाईक आदी उपस्थित होते.