कालकुंद्री येथे नवरात्रौत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2018

कालकुंद्री येथे नवरात्रौत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन


शारदिय नवरात्रौत्सवानिमित्त कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदिप सार्वजनिक वाचनालयामार्फत पचंक्रोशीतील श्रोत्यांसाठी शुक्रवार (ता. 12) ते रविवार (ता. 14) या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. चंदगड तालुक्याचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या कालकुंदी गावात प्रथमच व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात केले आहे. यामुळे जाणकार श्रोत्यामध्ये कुतुहुल व समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवार १२ पासुन सायंकाळी साडेसात वाजता होणऱ्या व्याख्यानमालेत डॉ. मधुकर जाधव यांचे शिवाजी महाराज या विषयावर, १३ रोजी डॉ. अशोक मलगोंडी यांचेस संस्कार काळाची गरज, १४ रोजी मखलाकभाई मुजावर यांचे धर्म आणि राष्ट्रवाद यावर व्याख्यान होणार आहे. कालकुंद्री परिसरातील विद्यार्थी, पालक यांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले आहे.