चंदगड तालुक्यात नवरात्रौत्सवानिमित्त दुर्गा दौडीला उत्साहात प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2018

चंदगड तालुक्यात नवरात्रौत्सवानिमित्त दुर्गा दौडीला उत्साहात प्रारंभ

छत्रपती शिवरायांच्या जयघोषात नवरात्रौत्सवानिमित्त चंदगडसह मजरे कार्वे, कोवाड, नागरदळे, दड्डी, राजगोळी खुर्द, राजगोळी बु., कुदनूर, खन्नेहट्टी, मलतवाडी, कडलगे, तेऊरवाडी, हडलगे यासह तालुक्यात ठिकठिकाणी दुर्गादौंडला प्रारंभ झाला. चंदगड येथे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गामातादौडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

चंदगड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने चंदगड येथे दौडीच्या माध्यमातून देव, देश व धर्मासाठी पुण्यश्‍लोक, छ. संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपुर्ती करीता आई जगदंबेच्या- दुर्गामातेच्या चरणी साकडे घालण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण या दौडीत सहभागी झाले होते. शेकडोंच्या संख्येने धारकरी आणि हिंदु धर्माभिमानी तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या. जगदंबेच्या, भवानी मातेच्या, शिवरायांच्या, हिंदु धर्माचा जयजयकार करत भारत माता, दुर्गामाता एक है-एक है... भारत माता आंबेमाता एक है- एक है... अशा घोषणांनी आणि श्‍लोकांनी संपुर्ण चंदगड परिसर दणाणून गेला होता. शेकडो धारकर्‍यांनी डोक्यावर धारण केलेल्या भगव्या फेट्यांमुळे वातावरण भगवे झाले होते. 

कोवाड व कोवाड परिसरातील अनेक गावांमधून दुर्गामाता दौडला घटस्थापनेच्या मुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला. ‘ देशासाठी जगायच रंशिवबानं सांगावा धाडलाय रं अशा प्रकारची गीते म्हणत हजारोंच्या संख्येने धारकरी दौडमध्ये सामील झाले. दौडीच्या पहिल्याच दिवशी युवा पिढी व महिला प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या. डोक्यावर भगवे फेटेटोप्या व हातामध्ये भगव्या पताकाशस्त्र घेवून जय शिवाजीजय भवानी असा जयघोष करत लहानांपासून थोरांपर्यंत दौडमध्ये सहभागी झाले. दौडच्या मार्गावर स्वागत कमानी व रांगोळ्या रेखाटल्या होत्या. नवरात्रौत्सवानिमित्त मंडळाकडून समाज प्रबोनधपर व्याख्यानशालेय वक्तृत्व स्पर्धाफॅन्सी ड्रेसविनोदी नाट्य स्पर्धाहळदी-कुंकू समारंभगुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोवाड परिसरातील दड्डीराजगोळी खुर्दराजगोळी बु.कुदनूरखन्नेहट्टीमलतवाडीकडलगेतेऊरवाडीहडलगे येथेही दुर्गामाता दौडला उत्साहत प्रारंभ झाला.

मजरे कार्वे शहीद जवान वेल्फेअर फौंडेशनच्यातवीने  छ. शिवाजी महाराजांचा जयघोष आणि जागो हिंदु जागो चा जागर करत पहाटे ५ वाजता  प्रेरणा मंत्राने दौडीला प्रारंभ झाला.  गल्ली बोळातून फेरी काढण्यात आली. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पारंपारिक वेशभूषेत अनेक तरुण, तरुणी सहभागी झाले होते. दुर्गामातादौडीच्या स्वागतासाठी प्रत्येक गल्लीच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान्या उभ्या केल्या होत्या. तसेच रांगोळ्यांनी रस्ते सजवले होते. महिलांनी औंक्षण घातले व फुलांची उधळण केली. शिवभक्तांच्या या जागराने मजरे कार्वे शिवभक्तमय झाले होते. या दौडीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अनिकेत सावंत व अनिकेत व्हटकर, पराग निट्टूरकर यांनी प्रेरणा मंत्र दिला. यावेळी सर्व तरुण मंडळे, महिला, विद्यार्थी, आबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्वे येथील मिरवणुकीत महिला डोकीवर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.