घटप्रभा नदीचा बुडून युवकाचा दुदैवी मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2018

घटप्रभा नदीचा बुडून युवकाचा दुदैवी मृत्यू


दिपक भिरोडकर

इब्राहिमपूर जवळील घटप्रभा नदीत बुडून दिपक कृष्णा भिरोडकर (वय-22, रा. हिंडगाव, ता. चंदगड) येथील युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी एक ते चार या दरम्यान हि घटना घडली. शंकर परशराम कुंदेकर (फाटकवाडी) यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली. यासंदर्भात माहीती अशी – दिपक हा आपल्या मित्रासोबत इब्राहिमपूर येथील घटप्रभा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जावून नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. आपला मित्र समोर बुडत असल्याचे पाहून त्याच्या अन्य मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. यातील एकनाथ म्हाडगुत व विश्वाम फाटक यांनी पाण्यात उतरुन दिपकचा शोध घेतला असता पोहत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्यांच्या मृत्यूने हिंडगाव गावावर शोककळा पसरली आहे. त्याचा पश्चात फक्त वृध्द आई आहे. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात मृतदेहाचे शवविच्छेदन करुन रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून सहा. फौजदार आर. के. पाटील तपास करीत आहेत. एन तारुण्यात दिपकचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घराण्याचा चिराग व शेवटची आशाही संपली...................
दिपक हा आई-वडीलांना एकुलता एक. दिपक चे वडील कृष्णा भिरोडकर हे त्याच्या लहानपणीच गेले. आईने मोठ्या कष्टाने त्याला लहानाचे मोठे केले. त्याला बारावी पर्यंत शिक्षण दिले. तिच्या जगण्यासाठी तोच एक आशेचा किरण होता. मुलगा मोठा होवून उतारवयात आपला सांभाळ करेल या आशेवर ती जगत होता. मात्र आज नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याने आईवर दुख:चा डोंगर कोसळला. मात्र त्याच्या अचानक जाण्याने घराण्याचा चिराग व त्या आईची शेवटची आशाही संपली आहे.