चंदगड : माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पाटील यांना पाठींब्याचे निवेदन देताना विद्यार्थ्यी |
प्राध्यापकांची
रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, तासिका
तत्वावरील प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करावी, प्रलंबित वेतन मिळावे, समान काम
समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी करावी, सातवा वेतन आयोग तातडीने अंमलबजावणी
करावी यासह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांच्या सुरु असलेल्या संपाला चंदगड येथील
र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील चंदगड तालुका विद्यार्थी संघटनेच्या वतीने
पाठिंबा दिला. यावेळी प्राचार्य
डॉ. पी. आर. पाटील यांना निवेदन दिले. २९ सप्टेंबर 2018 पासून प्राध्यापक वर्ग संपावर
गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे. परंतु
प्राध्यापकांच्या मागण्या रास्त असून सरकारने त्या मान्य कराव्यात अशी मागणी
विद्यार्थ्यांनी केली आहे. निवेदनावर शरद गावडे, श्रीपाद सावंत, सतिश तेजम, किशन पटेल, दर्शन
देसाई, राजेश सुतार यांच्या सह्या आहेत.