बेरड रामोशी समाजाला शासकीय सुविधा देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2018

बेरड रामोशी समाजाला शासकीय सुविधा देण्याची मागणी


चंदगड येथील पंचायत समितीमध्ये मागण्यांचे निवेदन देताना जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते.

बेरड रामोशी समाजाला शासकीय सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी चंदगड तालुका जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास आधिकारी आर. बी. जोशी यांना निवेदन देण्यात आले. चंदगड तालुक्यातील बेरड समाजातील जातीचे दाखले, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, नॉनक्रिमीलेयर दाखले, रेकार्ड कार्यालयातील जुने उतारे मिळत नाहीत अनेकवेळा हेळपाटे मारुन सुध्दा आजचे काम उद्यावर काम ढकलून दिवस काढण्याचे काम सुरु आहे. मुदतीत दाखले मिळावेत अन्यथा क्रांती संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष सीताराम नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सुभाष नाईक, जयवंत नाईक, आप्पाजी चाळूचे, कृष्णा नाईक, चाळोबा नाईक, नरसू गावडे आदींच्या सह्या आहेत.