हलकर्णी महाविद्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी व जागृती रॅली - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

हलकर्णी महाविद्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी व जागृती रॅली


'लोकशाहीत मतदार हा राजा असतो. मतदानाचा हक्क हा पवित्र हक्क असतो. आपले एक मत देशाचा, राज्याचा, गावचा इतिहास बदलु शकते. त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. १८ वर्षे पुर्ण झालेल्या सर्व युवक- युवतींनी आपली नावे मतदार यादीत नोंद करुण ती नोंद झाली की नाही याची खात्री करुण घेणे गरजेचे आहे. ' असे प्रतिपादन हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशंवतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबांळकर यांनी केले. हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ  विठ्ठल कनिष्ठ विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने मार्फत राबविलेल्या `नव मतदार नोंदणी व जागृती रॅली` उद्घाटण प्रसंगी बोलत होते.

हलकर्णी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने मार्फत राबविलेल्या `नव मतदार नोंदणी व जागृती रॅली` मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यींनी.

स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी केले. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली. यावेळी मतदार जनजागृतीसाठी हलकर्णी फाटा येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यींनी, प्राध्यापक मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वरीष्ठ प्रकल्प अधिकारी प्रा. ए. व्ही. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. एन. एम. कूचेकर यांनी आभार मांडले.