महिलांना स्वातंत्र्य देवून सन्मान करावा - पोलिस उपायुक्त सीमा लाटकर - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2018

महिलांना स्वातंत्र्य देवून सन्मान करावा - पोलिस उपायुक्त सीमा लाटकर

  ' स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने कार्य करणारी असून मुलींना उच्चविद्याविभूषीत करून आधिकारी बनवा. मुलींना प्रश्न विचारण्याचा हक्क असला पाहिजे.महिलांना स्वातंत्र्य देवून सन्मान करावा. बेकायदेशिर सुरू असलेले मटका -जुगार व अवैध दारू विक्री बंद करू तसेच एनजीओने तंटामुक्त गाव करून आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन- पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केले .                   .         
 NGO 'निर्मिती ' ग्रामीण अभिवृद्धी व समाजसेवा संस्था या संस्थेच्या उदघाटन कार्यक्रम कुद्रेमानी प्राथमिक मराठी शाळेत ग्राम पंचायत अध्यक्षा अशिताताई सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला.                   यावेळी उदघाटक म्हणून बेळगांव जिल्हा पोलिस उपायुक्त सीमा  लाटकर यांच्या हस्ते फीत सोडवून व दिपप्रज्वलन करून फलकाचे अनावरण करण्यात आले. क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले प्रतिमा अशिता सुतार, महात्मा ज्योतीराव फुले प्रतिमा पूजन ईश्वर गुरव , सरस्वती मूर्ती पूजन डॉ.मीना मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले .       
       
    कार्यक्रमाच्या सुरूवातीला 'स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ' या स्फुर्ती गीताने करण्यात आले. निर्मिती एनजीओच्या अध्यक्षा डॉ.मधुरा गुरव यांनी प्रास्ताविकमधून उद्देश स्पष्ट करताना म्हणाल्या, संपूर्ण ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी स्थापन झाला आहे . कुद्रेमानी गांवातील दारूबंदी  8०% झाली असून बेकायदेशीर युथ क्लब बंद करावा अशी मागणी ही केली .
यावेळी मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. कुद्रेमानी -वेंगुर्ला रोड नजीक असेलेला मटका -जुगार आड्डा उध्वस्थ करून बंद करणाऱ्या कार्यतत्पर प्रशासकीय अधिकारी बेळगांव जिल्हा पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांचा NGO निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी व समाजसेवा संस्थेच्या वतीने  शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुस्तक देवून  विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या बेळगांवची सिंघम लेडी व दुर्गा हीने कायदा व सुरक्षा सुव्यवस्था उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्राम पंचायत कुद्रेमानी यांच्या अध्यक्षा अशिता सुतार , ग्रा पं . सदस्य काशिनाथ गुरव, नागेश राजगोळकर व शामला गुरव यांनी  शाल, श्रीफळ व पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
तसेच बलभीम साहित्य संघाच्या वतीने मोहन शिंदे ,रवी पाटील , जी .जी. पाटील , राम गुरव यांनी शाल ,श्रीफळ व पुष्प देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी प्रमुख वक्त्या डॉ .मीना मोहिते यांचाही 'निर्मिती ' च्या वतीने शाल , श्रफिळ , स्मृतिचिन्ह , पुस्तक देवून सत्कार करण्यात आला . त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्षपदी निवड झालेले रवींद्र पाटील यांचा पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्त्या म्हणून डॉ .मीना मोहिते म्हणाल्या , 'ग्रामीण भागातील महिला सर्व क्षेत्रात पुढे आल्या पाहिजे. स्त्रीचा सन्मान हा नारी जातीचा सन्मान आहे. शिक्षणामुळेच महिलांना पुढे जात आहेत . विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी महिला करत आहेत. करिअर कत्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत .                   यावेळी ग्रा.पं. सदस्य नागेश राजगोळकर यांनी अवैद्यरित्या चालत असलेल्या व्यवसाय बंद करून कुद्रेमानी ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी पंचायतीच्या वतीने मागणी केली .
तसेच समाजसेविका लता पावशे , जवाहर देसाई यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली .                             
 यावेळी सीपीआय एस .एम. ताशिलदार, जवाहर देसाई, समाजसेविका लता पावशे, परशराम मोटराचे , जोतिबा बडसकर, अशोक नाईक ,ईश्वर गुरव, लक्ष्मण पन्हाळकर, वैजनाथ शिवणगेकर यासह बहुसंख्येने NGO'निर्मिती' सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवी पाटील यांनी केले तर आभार जी .जी. पाटील यांनी मानले .