युगपुरुष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासीक कार्याची दखल म्हणुन भारताचे राष्ट्रपती व
प्रधानमंत्री यांनी मला राज्यसभा खासदारकी बहाल केली. त्यामुळे देशाच्या ठराविक
भागाचा मी खासदार नाही, तर संपुर्ण भारतवासींयाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह
देशातील नागरींकाच्या व्यथा समजावून घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती
शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार सभांजीराजे यांनी केले. कालकुंद्री (ता.
चंदगड) येथील त्यांच्या फंडातुन मंजुर झालेल्या गावाअतंर्गत रस्ते व जिल्हा परिषद शाळा
सक्षमीकरण काम शुभारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी पै. विष्णु जोशिलकर होते.
![]() |
कालकुंद्री
(ता. चंदगड) येथे गावाअतंर्गत रस्ते व जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरण शुभारंभप्रसंगी
बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले. |
स्वागत
ग्रामपंचायत प्रशासक डी. एम. वाडेकर व ग्रामसेवक व्ही. बी. भोगण यांनी केले. प्रास्ताविक
डॉ. हरीष पाटील यांनी केले. खास. सभांजीराजे पुढे म्हणाले, `` २००९च्या
निवडणुकीत मी पराभुत झालो. चंदगड तालुक्यात फक्त एकदाच प्रचाराला
आलो तरीसुद्धा जिल्हयात सर्वाधिक मतदान चंदगड तालुक्याने दिले. गरीब व स्वाभिमानी लोकांचे
ऋण न फिटणारे आहे. त्याच्या विकास करणे ही माझी जबाबादीर असल्याचे सांगितले. कालकुंद्रीसह
कीणी ,कलीवडे, डुक्करवाडी, गधंर्वगड
येथेही खास. सभांजीराजेच्या फडांतुन मजुंरकामाचा शुभारंभ करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटु चद्रंकात मनवाडकर याचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल
किणी येथे खासदार सभांजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कालकुंद्रीसह
कुदनुर, राजगोळी, कोवाड, ढोलगरवाडी राजे प्रेमीनी प्रचंड गर्दी
केली. यावेळी जिल्हा सघांचे सचांलक विनोद पाटील, शिवाजी कोकीतकर, अशोक पाटील, गजानन पाटील, शिवराज्यभिषेक समितीचे अध्यक्ष
फत्तेसिहं सावंत, माजी
जि.प. सदस्य सौ. सुजाता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.