सांगातीने सामाजिक बांधिलकी जोपासली- तहसिलदार शिंदे - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

सांगातीने सामाजिक बांधिलकी जोपासली- तहसिलदार शिंदे


' यशाची व पदाची हवा डोक्यात शिरून न देता पुर्व स्थितीचा विचार करुन समाजासाठी कार्य केले पाहीजे. सांगाती एक आर्थिक पतंसस्था असुनही समाजातील वेगवेगळ्या घटकांना मदतीचा हात देत सामाजीक बांधिलकी जोपासली. सांगातीचा हा उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन तहसिलदार शिवाजीराव शिंदे यांनी केले. शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आयोजीत केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मोनाप्पा पाटील होते.
शिनोळी (ता. चंदगड) येथील सांगाती पतसंस्थेच्या वतीने आयोजित विद्यार्थांचा गुणगौरव कार्यक्रमात बोलताना तहसिलदार शिवाजी शिंदे, शेजारी नितीन पाटील, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व इतर.

प्रास्ताविक प्रा. बाबुराव नेसरकर यांनी करुन सागांती परिवाराने सुरू केलेल्या कार्याचा बोध घेऊन आज अनेक विद्यार्थी अधिकारी बनले आहेत. याचा सांगाती परीवाराला अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, ओलमचे शेती अधिकारी सुधीर पाटील, मोनाप्पा पाटील, संस्थाउपाध्यक्ष नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावीमध्ये तालुक्यात प्रथम आलेल्या सुमैया शेख, कार्तिक पाटील, सस्कृंती काबंळे, जयराम पाटील, सागर मुतगेकर, अशोक गावडे, निवृत्ती गायकवाड अदिसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी सौ. मनिषादेवी कदम-पाटील, अनंत सदावर, डॉ. मधुकर जाधव, दशरथ भोगण, रमेश भोसले, सरपंच सौ. नम्रता पाटील, राजश्री पाटील, शांता बोकडे, स्वरूपा सावंत आदिसह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसचांलन गजानन सावंत यांनी केले तर आभार प्रा. एच. के. गावडे यांनी मानले.