शिक्षणासाठी माडखोलकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत योगदान दिले - डॉ. डी. आर. मोरे - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

शिक्षणासाठी माडखोलकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत योगदान दिले - डॉ. डी. आर. मोरे


'शेवटच्या श्वासापर्यंत र. भा. माडखोलकर यांनी दिलेले योगदान गौरवास्पद आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता ज्ञान दानाची चळवळ अविरत पणे पुढे नेण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी योगदान दिले. शिक्षण क्षेत्रात कालोचित परिवर्तन स्विकारूण ज्ञान दानात प्रसंगपरत्वे बदल करण्याच्या विधायक भुमिकेचा त्यांनी पुरस्कार केला  असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे शिक्षण सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांनी केले. चंदगड येथील खेडुत परीवाराच्या वतीने आयोजीत केलेल्या कै. र. भा. माडखोलकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमु पाटील होते.

चंदगड येथील खेडुत परीवाराच्या वतीने आयोजीत केलेल्या कै. र. भा. माडखोलकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बोलताना शिवाजी विद्यापिठाचे शिक्षण सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, शेजारी माजी मंत्री भरमू पाटील, सौ. विद्या बांदिवडेकर व इतर.

प्रारंभी प्रास्ताविक व्ही. जी तुपारे यांनी केले. माजी मंत्री भरमु पाटील म्हणाले, 'र. भा. माडखोलकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे समवयस्क कै. तुकाराम पवार, कै. गोविंदराव पवार, कै. कोणेरी बामणे, कै. एस. एन. पाटील या ध्येय प्रेरित व्यक्तिने ज्ञानाचे पावित्र जपले व अनिष्ठ गोष्टींना थारा न देता ज्ञान प्रसाराचे कार्य पारदर्शक पणे केले.  यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील,  अॅड. रामचंद्र बांदिवडेकर, प्रा. पी. सी. पाटील, प्रा. एस. पी. बादिंवडेकर, प्रा. एस. बी. पाटील, प्रा. एस. एन. करोशी अदिनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसचांलन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. आभार आर. आय. पाटील यांनी माडंले.