अडकूर येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

अडकूर येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या


दारुच्या नशेत गजानन विठ्ठल शिंदे (वय-38, रा. अडकुर, ता. चंदगड) याने रहाते घराचे तुळईला गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता हि घटना घडली. युवराज शिंदे यांनी याबाबतची माहीती चंदगड पोलिसात दिली आहे. यासंदर्भात माहीती अशी – आज सकाळी इंग्लिश मेडियम स्कुलच्या समोर असलेल्या गजानन शिंदे यांच्या घरी त्याने दारुची नशेत रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून सहा. फौजदार श्री. पाटील तपास करत आहेत.