कोवाड परिसरातील तीन गावामध्ये अज्ञाताकडून चोरी, 59 हजारांचा माल लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

कोवाड परिसरातील तीन गावामध्ये अज्ञाताकडून चोरी, 59 हजारांचा माल लंपास


कोवाड (ता. चंदगड) परिसरातील किणी, नागरदळे,  करेकुंडी या तीन गावामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरे व दुध संस्था फोडून 59 हजार 80 रुपयांचा माल लंपास केला. गजानन बाबु हुंदळेवाडकर (रा. किणी) यांनी याबाबतची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. आज सकाळी साडेबारा ते सहा या दरम्यान हि घटना घडली. किणी येथील कल्मेश्‍वर दूध संस्थेमध्ये कपाटे ड्रॉवर तोडून चोरट्यांनी सुमारे २५ हजार रोख रक्कम लंपास केली. गजानन बाबु हुंदळेवाडकर यांच्या घर फोडून रोख रक्कम साडेसात हजार व अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण व चांदीचे दागिने. यासह यामध्ये 25 हजार, साडेसात हजार, दोन हजार दोनशे पन्नास, 11 हजार दोनशे पन्नास, नऊ हजार, चार हजार अशा किंमतीचे माल अज्ञातांनी लंपास केले. यामध्ये सोन्याची कर्णफुले, सोन्याचे मणी मंगळसुत्र, सोन्याचे बारीक मणी व बोरमाळ, चांदिचे दागिणे असे लंपास केले आहेत. चोरट्यांनी कुलुप बंद घराचे कडी कोयंडा उचकटून घर व दुध संस्थेमध्ये प्रवेश करुन तिजोरीतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. तीन गावामध्ये अज्ञात चोरट्यांनी 59 हजार 80 रुपयांचा माल लंपास केला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॅ. श्री. चव्हाण तपास करीत आहेत.