कब्बडी स्पर्धेत कालकुंद्री येथील कल्मेश्‍वर संघ प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

कब्बडी स्पर्धेत कालकुंद्री येथील कल्मेश्‍वर संघ प्रथममर्णहोळ (ता. बेळगांव) येथील कृष्ण गवळी युवक मंडळ व गजानन युवक मंडळाने आयोजित केलेल्या ५५ किलो वजनी गटातील कब्बडी स्पर्धेत कालकुंद्री येथील कल्मेश्‍वर स्पोर्टस् क्लबने प्रथम क्रमांकाचे ५५५५ रुपयांचे बक्षिस पटकावले.  उपविजेता काळमावाडी संघाने ३३३३ रुपये, राजगोळी बु. संघाने २२२२ रुपये तसेच आत्याळच्या संघाने ११११ रुपये क्रमांचे बक्षिस पटकावले. अंतिम सामन्यासाठी कल्मेश्‍वर संघाकडून सचिन कांबळे, कल्लापा पाटील, अजिंक्य तेऊरवाडकर, आकश पाटील, सुमित भातकांडे, सदाशिव पाटील, किरण पाटील, अफरोज मुल्ला, राजू खवणेवाडकर या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी केली. कृष्णा वर्पे याने उत्कृष्ठ चढाईचा मान पटकावला.