सुंडी येथे ६७ लाभार्थ्यांना गॅस वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

सुंडी येथे ६७ लाभार्थ्यांना गॅस वाटप


सुंडी येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनजीवन योजनेंर्गंत ६७ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले.  प्रास्तविक उपसरपंच प्रताप पाटील यांनी केले. यावेळी जि. प. सदस्य अरुण सुतार व माजी जि.प. शिक्षण सभापती महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अरुण सुतार, महेश पाटील, वनक्षेत्रपाल एस. के. परब, सुर्यकांत पाटील, प्रविण वाटंगी यांच्या हस्ते गॅस वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच शिल्पा मुतगेकर, उपसरपंच प्रताप पाटील, सरीता पाटील, संगीता कांबळे, शंकर गिरी, शिवाजी पाटील, एन. एन. पाटील, तानाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. आभार राजीव पाटील यांनी मानले.