कानूर बु. येथील भावेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी
पतसंस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे
उपाध्यक्ष नामदेव नारायण मोरे होते. अहवाल वाचन सचिव संजय
बाबुराव आगाचे यांनी केले. संस्थेला आर्थिक सालात ३ लाख १४ हजार रुपयांचा नफा
झाल्याचे आगाचे यांनी यांनी जाहीर केले. तर सभासदांना १० टक्के लाभांश वाटप
करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक शिरोडकर यांनी जाहीर करण्यात केले.
तसेच यावेळी सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला. यावेळी भिमना मोरे, गीता गुरव, तुकाराम मोहिते, गोविंद
फाटक, सागर मस्कर, सरस्वती गणाचारी,
अशोक आगाचे, तुकाराम गुरव, विक्रम कोंडूसकर, शुभांगी देसाई, विनायक चौकुळकर, निवृत्ती गुरव, विश्वनाथ कुडतकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. आभार संजय आगाशे यांनी
मानले.
17 October 2018
Home
chandgad
कानूर बु. येथील भावेश्वरी पतसंस्थेला ३ लाख १४ हजाराचा नफा