किर्तीकुमारला थाळीफेक व गोळाफेकमध्ये सुवर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2018

किर्तीकुमारला थाळीफेक व गोळाफेकमध्ये सुवर्ण

किर्तीकुमार बेनके

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या आंतर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा खेळाडू किर्तीकुमार जयप्रकाश बेनके याने थाळीफेक व गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकासह शिवाजी विद्यापीठाची वैयक्तिक चॅम्पियनशीप पटकावली. कल्लाप्पा जयवंत कांबळे याने 20 किलोमीटर चालणे या क्रिडा प्रकारात रौप्यपदक पटकावले. कीर्तीकुमार याची मेंगलोर विद्यापीठ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. प्राचार्य डॉ. पी आर. पाटील यांचे प्रोत्साहन व क्रिडा संचालक प्रा. एस. एम. पाटील व प्रा. बी. सी. शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.