ओलमचे (हेमरस) सात लाख टन गाळपाचे उदिष्ट - भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2018

ओलमचे (हेमरस) सात लाख टन गाळपाचे उदिष्ट - भरत कुंडल


ओलमच्या यशात शेतकरी व कामगारांचे फार मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या सुख - दुःखात हेमरस कारखाना सहभागी होऊन कार्य करत आहे. त्यामुळे दरवर्षी ऊस गाळपात चढता क्रम मिळवला आहे. या वर्षीही शेतकऱ्यांच्या सहकार्यावरच सात लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट व्यवस्थापनाने निश्चित केले आहे. या वर्षी ऊसावर हुमणी व मावा रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. उत्पादन कमी ' झाले तरी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार असल्याचे प्रतिपादन ओलम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम अॅग्रो (हेमरस) या कारखान्याच्या नवव्या गळीत हंगाम शुभांरभ प्रसंगी ते बोलत होते.


यावेळी श्री. कुंडल पुढे म्हणाले, ' ओलमणे गतवर्षीच्या गाळपास आलेल्या ऊसाला विभागातील इतर कारखान्यापेक्षा जादा दर दिलेला आहे. यावर्षीही एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देणार असल्याचे सांगितले. प्रारंभी शेती अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते वजन काटयाचे पुजन करण्यात आले. श्री. कुंडल, पी देवराजलु, राजगोळी बुद्रुक सरपंच मावळेश्वर कुंभार, राजगोळी खुर्द सरपंच शिवाजी सडाके, सरपंच सुरेश हंजी (शिवापूर), सरपंच शालण कांबळे (कुदनुर) आदि सह मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकूण गळीताचा शुभारंभ करण्यात आला.  प्रास्ताविक व स्वागत एच. आर. प्रमुख सतीश भोसले यांनी केले. आभार अनिल पाटील यांनी मानले. यावेळी कामगार, शेतकरी, तोडणी वाहतुकदार उपस्थित होते.

380 रुपये देणार
सन २०१६-१७ गाळपास आलेल्या ऊसाला एफ. आर. पी. प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. ऊर्वरीत प्रतीटन शिल्लक रक्कम तिनशे ऐंशी रुपये महीनाभरात दोन टप्यात देणार असल्याचे भरत कुंडल यांनी यावेळी सांगितले.