खासदार राजू शेट्टी यांची सोमवारी पाटणे फाटा येथे सभा - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2018

खासदार राजू शेट्टी यांची सोमवारी पाटणे फाटा येथे सभा


चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागील थकीत बिले वसुल करण्यासंदर्भात कारखानदारांना जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  खासदार राजू शेट्टी यांची सोमवारी (ता. 22) पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के चव्हाण महाविद्यालय येथे सकाळी अकरा वाजता सभा आयोजित केली आहे. सभेला राज्य सचिव राजेंद्र गड्डयानावर, माजी सभापती जगनाथ हुलजी, बाळाराम फडके, सरपंच राजू पाटील, विश्वनाथ पाटील प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. आपल्या भागातीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागिल थकित रक्कम वसूल करण्यासंदर्भात कारखानदाराना जाब विचारण्यात येणार आहे. मागील गळीत हंगाम २०१६-२०१७ मधील थकित १५० रु, गळीत हंगाम २०१७ - २०१८ मधील जाहिर ३००० रू, चालू गळीत हंगामाबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. दिपक पाटील यांनी केले आहे.