शिवाजी महाराज जागतिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक – प्रा. मधुकर जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2018

शिवाजी महाराज जागतिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक – प्रा. मधुकर जाधव


'छत्रपती शिवाजी महाराज जागतिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक आहेत. त्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास अमेरिका, रशिया,  इंग्लंड,  जर्मनी आदी देशात होताना दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज भुगर्भशास्त्र,जलशास्त्र,वासतुशास्त्र,पर्यावरण शास्त्र, अर्थशास्त्र, युध्दशास्त्रात निष्णात होते असे प्रतिपादन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. कार्वे (ता.चंदगड) येथील कला व विज्ञान महाविद्यालयात डॉ. घाळी महाविद्यालय गडहिंग्लज अंतर्गत 'समाज रचना व समाज शास्त्र' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते ते बोलत हते.
प्रा. जाधव पुढे म्हणाले,``छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली संदेशवहन यंत्रणा वैशिष्ठपुर्ण होती. किल्ला बांधणीचे शास्त्र अतिउच्च दर्जाचे होते. त्यांचे गणिमीयुद्शास्त्र आजही जगात युद्ध प्रसंगी वापरले जाते. त्यांची दळणवळण व्यवस्था, न्याय व्यवस्था वाखाणण्याजोगीच होती. महाराजांच्या अंगी विशाल द्रुष्टी होती. त्यांच्या विचारांचा आजही व पुढील काळात फार मोठा उपयोग होत राहणार असल्याचे सांगितले.`` प्रास्ताविक प्रा. पी. एस. कांबळे यांनी केले. प्रा. पी. डी. कांबळे परिचय करून दिला. प्राचार्य एस. ए. पाटील, प्रा. गजानन पाटील, प्रा. पी. ए. घोंगडे,  प्रा. ऊत्तम पाटील, प्रा. विजय गावडे, प्रा. जे. के. पाटील, शरद गुरव, संदीप पाटील, सी. एल. गावडे, विलास नाईक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. सौ. एस. डी. देशमुख यांनी केले तर आभार प्रा. के. बी. कलजी यांनी मानले.