माणगाव येथे शेतकऱ्यांनी ऊस वाहतुक रोखली - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2018

माणगाव येथे शेतकऱ्यांनी ऊस वाहतुक रोखली



माणगाव (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांनी हेमरसकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅकट रोखला.

माणगाव (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी हेमरस साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर रोखला. ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी जोपर्यंत मागील गळीत हंगामातील थकीत रक्कम मिळत नाही. तोपर्यंत ऊस वाहतुक सुरु करायला देणार नाही असा निर्धार करुन ऊस वाहतुक रोखून वाहने माघारी पाठविली.
हेमरस साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाल्याने कळसगादे येथून मंगळवारी ऊस घेवून हेमरसकडे ट्रॅक्टर निघाला होता. सकाळी माणगांव येथे पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून चालकाला जाब विचारुन शेतकऱ्यांच्या जमावाने ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांनी जोपर्यंत मागील गळीत हंगामातील थकीत रक्कम मिळत नाही. तोपर्यंत ऊस वाहतुक सुरु करायला देणार नाही असा निर्धार करुन ट्रॅक्टर माघारी पाठविला. यावेळी शिवाजी पाटील, जयवंत सुरुतकर, रमाकांत बेनके, लक्ष्मण सेसमारी, आप्पाजी होनगेकर, दत्तु होनगेकर, प्रकाश बैलुरकर, लक्ष्मण कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.