कारखान्याकडील मागील बिलाबाबत पाटणे फाटा येथे बैठकीचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2018

कारखान्याकडील मागील बिलाबाबत पाटणे फाटा येथे बैठकीचे आयोजन


तालुक्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू झाले असले तरी मागील बाकी दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करायचा नाही.  वाहनधारकांनी सुध्दा आपली वाहने चालु करू नये असा ठाम निर्णय पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे झालेल्या प्रमुख शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दरवर्षी गळीत हगांम सुरू झाला की मागील बिल येण्यासाठी कष्टकरी शेतकरी वर्गाला वारंवार आंदोलणे करावी लागत आहेत. दरवर्षी आंदोलने करण्यापेक्षा एकदाच काय तो तोडगा काढण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांनी, तालुक्यातील सर्व गावच्या सरपंच, शेतकरी,  कामगार व वाहनधारकांनी २ नोव्हेबंर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता पाटणे फाटा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जनआदोंलन कृती समिती मार्फत करण्यात आले आहे. या बैठकीला विष्णु गावडे (सरपंच जगंमहट्टी ),  रविंद्र पाटील,  राजु हेरेकर, राजाराम फडके, जयवंत सुरूतकर, कुमाणा शंकर पाटील,  दत्तु बेळगावकर, दिपक गावडे अदिसह शेतकरी संख्येने उपस्थित होते.