रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण शहरात १३ व १४
नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया जर्नलिस्ट अॅण्ड फ्रेन्ड सर्कल या पत्रकार सघंटनेने आयोजित
केलेल्या राज्यस्तरीय संमेलनासाठी चंदगड तालुका पत्रकार सघांचे सर्व सदस्य उपस्थित
राहणार असल्याची माहीती अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. दाटे (चंदगड) येथे
आयोजित केलेल्या पत्रकारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पत्रकारांच्या विविध अडचणी विषयी चर्चा करणे,
ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या समस्या त्यावर मार्ग काढणे. आजपर्यंत चंदगड
तालुक्यातील पत्रकार संघटना एकटी होती. आता मात्र त्यांना राज्य संघटनेचा पाठींबा
आहे. चिपळुण येथे होणाऱ्या संमेलनात तालुक्यातील पत्रकाराच्या समस्या माडंणार
असल्याचे कोल्हापुर डिस्ट्रिक्ट रिपोटर्से वेलफेअर असोशिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल
धुपदाळे यांनी सांगितले. चंदगड तालुका पत्रकार सघांचे संस्था अध्यक्ष उदयकुमार
देशपांडे यांनी ``अधिस्विकृतीच्या
नावाखाली मोजक्याच पत्रकारांना त्याचा फायदा होत आहे. ग्रामीण पत्रकारांना
कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी सघंटनेच्या माध्यमातुन पाठपुरावा करणे
गरजेचे असल्याचे सांगितले.`` यावेळी तालुक्यातील सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी व वार्ताहर उपस्थित
होते. आभार सघंटणेचे खजिणदार सपंत पाटील यांनी मानले.