तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी सातू
कांबळे यांचे मधमाशांच्या हल्ल्यात निधन झाले. त्यांच्या वारसांना सरकारकडून
अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यांच्या वारसांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चंदगड तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून
केली आहे. मधमाशी, गांधीलमाशी या हल्ल्यात माणूस
मृत्युमुखी पडल्यास व्यक्तींच्या वारसांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी
या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस रवींद्र पाटील, प्रकाश
कोल्हाल, ज्योतीप्रसाद पाटील, दौलत सभासद संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय पाटील, आशिस
कुटिनो व विठ्ठल गोंधळी उपस्थित होते.
22 October 2018
Home
chandgad
मधमाशांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना नुकसान भरपाईची मागणी