हेरे (ता. चंदगड) येथील गौरव समितीमार्फत पोलिस
दल, वीर जवान मात-पिता व माजी सैनिक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ होते. बाबुराव कोरवी यांनी प्रास्ताविक केले. शहीद
जवान राजेंद्र तुपारे, कै. अनंत धुरी यांच्या पित्यांचा सत्कार सभापती बबन देसाई
यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. हेरे गावातील 1930 ते आज अखेर देशसेवा
केलेल्या माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. माजी सैनिक गोविंद पवार
यांनी सर्व युवकांना देशसेवेत दाखल होऊन आपली वीरता धाडस देशासाठी अर्पण करा असे
आवाहन केले. केंद्रप्रमुख यांनी गौरव समितीने केलेल्या आयोजनाबद्दल कौतुक केले. सत्कारमूर्ती
चंद्रकांत पाटकर यांच्या प्रमाणेच सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, जिद्द,
समाजप्रियता आणि सेवाकाळात आपल्या मुलांवर योग्य संस्कार करा असे सांगितले. रवींद्र
हंपन्नावर यांच्या हस्ते चंद्रकांत पाटकर दांपत्याचा पोलिस दलातून सेवानिवृत्त
झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पाटकर यांनी आपल्या
देशसेवेतील अनुभवन कथन केले. यावेळी गौरव समिती अध्यक्ष पंकज तेलंग प्रमुख उपस्थित
होते. अवधूत भोसले यांनी सूत्रसंचालन केले. विशाल बल्लाळ यांनी आभार मानले.
22 October 2018
Home
chandgad
हेरे येथे माजी सैनिकांच्या माता - पित्यांचा सत्कार