कालकुंद्री येथे उज्वला योजने अंतर्गत लाभार्थ्यांना गॅस वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2018

कालकुंद्री येथे उज्वला योजने अंतर्गत लाभार्थ्यांना गॅस वाटपकालकुंद्री (ता. चंदगड) येथे उज्वला योजनेतून लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करताना. 
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे पंतप्रधान उज्वला योजनातून २५ लाभार्थ्यांना सिलेंडर गॅस शेगडी व टाकीचे वाटप करण्यात आले. समाजातील वंचितांपर्यंत गॅस मिळावा यासाठी सरकारने उज्वला गॅस वाटप योजना सुरु केली आहे. या अंतर्गंत कालकुंद्री येथील सुमन बाळासो सकट, सुधा ज्ञानेश्‍वर लोहार, सुमन मारुती पाटील, सुमन शंकर कांबळे, गंगुबाई मारुती कांबळे, शामला पाटील आदी लाभार्थ्यांना देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य भरमू तातोबा पाटील, विनोद पाटील, अशोक पाटील, शरद रामू जोशी, श्रीकांत कदम, मारुती सावंत, पांडूरंग गायकवाड, राजू पुजारी, परशराम कोकीतकर, कल्लापा बागिलगेकर, विवेक पाटील, ईश्‍वर वर्पे, पुंडलिक जोशी आदी उपस्थित होते.