कागणी येथे चंदगड तालुका संघाच्या शाखेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

कागणी येथे चंदगड तालुका संघाच्या शाखेचा शुभारंभकागणी येथे चंदगड तालुका शेतकरी सहकारी खेरदी-विक्री संघाच्या शाखेचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अमृत देसाई होते. स्वागत गुंडोपंत देसाई यांनी केले. प्रास्तविकात एस. वाय. पाटील यांनी तालुका संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. राजेश पाटील यांनी संस्था प्रगतीपथावर नेण्यास सभासद व ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री व्यवहार केल्यामुळेच संघाची प्रगती झाली. सध्या संघाचा व्यवहार ५० ते ५५ कोटीपर्यंत असून भविष्यात १०० कोटी पर्यंत वाढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून मिळालेल्या नफ्यातून संस्था स्वभांडवलावर उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे. संघाचा व्यवहार वाढवण्यासाठी आजरा, गडहिंग्लज, बेळगांव तालुक्यात शाखा चालू करणार असल्याचे सांगितले. यावेळी  माजी सहाय्यक निबंधक सटूप्पा बाचूळकर, माजी सचिव बी. पी. कोकीतकर, दिग्विजय देसाई यांनी संघाच्या चाललेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष पोमाणा पाटील, सरपंचा सौ. सुप्रिया कांबळे, शामराव देसाई, गणपतराव देसाई, दिलीप खानापूरे, रामचंद्र देसाई, अविनाश देसाई, संतोष बेळगांवकर, महादेव पाटील, मारुती बाळेकुंद्री, एस. एल. पाटील, बाळासाहेब खवरे आदी उपस्थित होते. आभार मारुती बाचूळकर यांनी मानले.