मजरे कार्वे येथे स्वागत कमानीचा गुरुवारी पायाभरणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2018

मजरे कार्वे येथे स्वागत कमानीचा गुरुवारी पायाभरणी

मजरे कार्वे येथील शहीद जवान वेलफेअर फौंडेशनच्यावतीने गुरुवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता देश सेवा बजावताना शहीद झालेले वीर जवान राजेंद्र नारायण तुपारे व शहीद मनोहर मारुती हारकारे यांची स्मृति आणि बलिदान जागृत ठेवण्यासाठी गावाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभी करण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष पांडूरंग बेनके यांनी दिली. पायाभरणीचे उद्घाटन आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, भाजपा राज्यकार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील, गोकुळचे संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते  सरपंचा सौ. निशा भागोजी बोकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी वीरपत्नी शर्मिला तुपारे, वीरमाता सरस्वती हारकारे, जि. प. सदस्य अरुण सुतार, कल्लापा भोगण, सचिन बल्लाळ, सौ. विद्या पाटील, पं. स. सभापती बबनराव देसाई, उपसभापती विठाबाई मुरकुटे, नुतन सरपंच शिवाजी तुपारे, दयानंद काणेकर, ऍड. अनंत कांबळे, जगन्नाथ हुलजी, रुपा खांडेकर, मनिषा शिवनगेकर, नंदीनी पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.